गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

Rich Dad Poor Dad

 



"Rich Dad Poor Dad"हे 'Personal finance' या विषयावरील कदाचित जगातील पहिलं पुस्तकअसावं. लेखक आहेत -जपानी मूळ असलेले अमेरिकी नागरिक- रॉबर्ट कियोसाकी.या पुस्तकात त्यांनी पैशाबद्दल एक आगळावेगळा दृष्टीकोन मांडलेला आहे.शिवाय फक्त साक्षर नव्हे तर अर्थसाक्षर असणं  आजच्या काळात किती गरजेचं आहे, हे त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून सांगितलेलं आहे.

     नावाप्रमाणेच ,पुस्तकात "Rich Dad"व "Poor Dad" या दोघांची तुलना लेखकाने केलेली आहे."Rich Dad"म्हणजे, लेखकाच्या मित्राचे वडील.ते पेशाने व्यावसायिक आहेत व त्यांचं जेमतेम शिक्षण झालेलं आहे.याउलट "Poor Dad"आहेत,स्वतः लेखकाचे वडील. जे उच्चशिक्षित असून शिक्षक आहेत. दोघांचेही वडील आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत.दोघांची मिळकत जवळपास सारखी आहे.असं असूनही लेखकाच्या वडिलांना नेहमीच पैशाची चणचण भासते व ते सबंध आयुष्य डोक्यावर कर्जाचं ओझं वाहतात. तर मित्राचे वडील,त्यांच्या पुढील आयुष्यात,चर्चला भरपूर देणग्या देऊनही,अमाप संपत्ती जमवितात.

     जवळपास सारखी मिळकत असणारे हे दोघं,आर्थिकदृष्ट्या दोन विरुद्ध टोकं का गाठतात ??याचाच अनुभवसंपन्न प्रवास म्हणजे.. "Rich Dad Poor Dad". लेखक स्वतःच्या वडिलांना "Poor Dad"व मित्राच्या वडिलांना "Rich Dad" का म्हणतात? ते पुस्तकात त्यांनी सकारण सांगितलेलं आहे. लेखक बालपणापासून स्वतःच्या वडीलांना "Follow"न करता, मित्राच्या वडिलांना "Follow" करतात,त्यांना आदर्श मानतात. व त्यांच्याकडूनच आर्थिकदृष्ट्या संपन्न बनण्याचा मूलमंत्र शिकून,ते श्रीमंत होतात.

   "Rich Dad"म्हणतात...

1)"The poor and middle class work for money.The rich have money work for them."

गरीब व मध्यमवर्गीय पैशांसाठी काम करतात तर श्रीमंतांसाठी पैसा काम करतो. 

 2)"It's not how much money you make, It's how much money you keep." 

तुम्ही किती पैसा कमविता यापेक्षा किती टिकवून ठेवता हे महत्त्वाचे आहे. कारण पैशाचे नियोजन न जमल्यामुळे करोडो रुपये असणारे आज रंक झालेले दिसतात.

3)"Rich people acquire asset.The poor and middle class acquire liabilities that they think are assets."

श्रीमंत हे मालमत्ता घेतात तर गरीब व मध्यमवर्गीय दायित्व विकत घेतात किंवा दायित्व मिळवतात व त्या दायित्वालाच ते मालमत्ता समजतात. 

4)"An asset puts money in my pocket.A liability takes money out of my pocket." 

जेव्हा तुम्ही मालमत्ता विकत घेता,तेव्हा तुमच्या खिशात पैसा येत असतो.परंतु जेव्हा तुम्ही दायित्व विकत घेता तेव्हा पैसा तुमच्या खिशातून बाहेर जात असतो.

5)"A person can be highly educated, professionally successful and financially illiterate."

" एखादी व्यक्ती उच्चशिक्षित व व्यावसायिकदृष्ट्या  यशस्वी असूनही आर्थिकदृष्ट्या निरक्षर असू शकते,असं लेखकाला वाटतं.म्हणून,Rich Dad,यांच्या म्हणण्यानुसार,आजच्या पिढीला शालेय शिक्षणासोबतच आर्थिक शिक्षण देणे गरजेचे झालेले आहे.

6)"The single most powerful asset we all have is our mind.If it is trained well,it can create enormous wealth."

 जगातली सर्वात उत्तम व शक्तिशाली मालमत्ता म्हणजे आपला मेंदू.जर आपण आपल्या मेंदूला व्यवस्थितरित्या प्रशिक्षित केलं,तर आपण आपल्या मेंदुचा(डोक्याचा) वापर करून अमाप संपत्ती निर्माण करू शकतो.

7)"Great opportunities are not seen with your eyes.They are seen with your mind."

महान संधी फक्त डोळ्यांनी दिसत नाही तर त्यासाठी डोकं वापरावं लागतं.

8)"Work to learn, don't work for money."

सर्वप्रथम, शिकण्यासाठी काम करा,केवळ पैशासाठी काम करू नका.कारण, काम शिकून तुम्ही आयुष्यभर पैसा कमवू शकता.

9)"The primary difference between a rich person and a poor person is how they manage fear."

 श्रीमंत व्यक्ती त्यांच्या जीवनात रिस्क घेत असतात.ते व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये रिस्क घेण्यास अजिबात घाबरत नाहीत .याउलट गरीब व मध्यमवर्गीय भीतीपोटी रिस्क घेण्यात मागे पडतात आणि त्यामुळेच ते संपत्ती निर्माण करू शकत नाहीत .

10)"The most people, the reason they don't win financially,is because the pain of losing money is far greater than the joy of being rich."

जगात जास्तीत जास्त लोक आर्थिकदृष्ट्या संपन्न यासाठी होत नाहीत कारण त्यांना श्रीमंत होण्याच्या आनंदापेक्षा पैसे गमावण्याची भीती जास्त वाटते.

11)Rich dad believed that the words,"I can't afford it."shut down your brain."How can I afford it."open up opportunities.

"Rich dad"एखादी वस्तू मी विकत घेऊ शकत नाही"यावर विश्वास ठेवत नाहीत.कारण यामुळे मेंदू काम करणे थांबवितो. याउलट "मी कशा पद्धतीने ती वस्तू घेऊ शकेल"यावर विश्वास ठेवतात. कारण, हे वाक्य तुमच्यासाठी पैसे कमविण्याच्या अनंत संधी निर्माण करू शकतं.

12) "There is gold everywhere,most people are not trained to see it." सगळीकडे संधी असते परंतु काही लोकांना त्या दिसत नाहीत. कारण त्यांनी ती दृष्टी विकसित केलेली नसते. 

..म्हणून या पुस्तकात रॉबर्ट कियोसाकी काही खास गोष्टी सांगून जातात.

 @तुम्ही कोणतीही नवीन गोष्ट किंवा कौशल्य शिका.त्यानंतरच तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता .

@तुम्ही काळजीपूर्वक तुमचे मित्र निवडा की जेणेकरून तुम्हाला संपत्ती निर्माण करण्यात त्यांची मदत होऊ शकेल.

@तुम्ही स्वयंशिस्त पाळा व पैसा स्वतःच्या गुंतवणुकीवर आधी खर्च करा.त्यानंतर इतरांचे देणे द्या. 

@ Use asset to buy luxuries. तुम्हाला जर काही चैनीच्या गोष्टी घ्यायच्या असतील तर तुमच्या मालमत्ते मधून येणाऱ्या पैशाने त्या चैनीच्या वस्तू घ्या.कर्ज घेऊन चैनीच्या वस्तू घेऊ नका. 

@तुमच्या समोर एखादा आदर्श व्यक्ती ठेवा की ज्या पासून तुम्ही प्रेरणा घेऊ शकाल.

@ नवीन नवीन संकल्पना किंवा आयडियाचा शोध घ्या व त्या संकल्पनेवर काम करून त्यामधून संपत्ती निर्माण करता येते काय,याचा विचार करा.

@मार्केटमध्ये प्रत्येक गोष्टीवर बार्गेनिंग केले जाऊ शकते म्हणून कोणतीही मालमत्ता किंवा वस्तू घेताना तुम्ही बार्गेनिंग  करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ती मालमत्ता कमी पैशात मिळू शकेल.

@ एखादी वस्तू तुम्हाला जर विकायची असेल तर आधी घेणारे शोधा आणि मग ती वस्तू खरेदी करा.

@ आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे मोठी स्वप्नं बघा. तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात संपत्ती निर्माण करू शकता. नाहीतर सबंध आयुष्य तुम्हाला कर्जाच्या ओझ्याखाली घालवावं लागेल.

 अशा प्रकारे "Rich dad, Poor dad"या पुस्तकामध्ये रॉबर्ट कियोसाकी आपल्याला श्रीमंत होण्याचा एक पासवर्ड देऊन जातात एवढं मात्र नक्की.

To buy a book:

"Rich Dad Poor Dad"

Touch the link below:-

https://amzn.to/3sy1Lap


.......©मराठी अनुवाद(Review)©...By.. https://glocalmarathi.blogspot.com



रविवार, १ ऑगस्ट, २०२१

विहीर

 

Courtesy:Pixabay


सकाळचे साडेसात वाजले असतील,विशालला आज जरा उशीराच जाग आली."आई,ये आई!असं म्हणून त्याने कमलाबाईला आवाज दिला.प्रतिसाद न मिळाल्यामुळे घरातल्या दोन्ही खोलीत त्याने तिला शोधले. शेजारीपाजारी सगळीकडे शोधाशोध केली. तरीही तिचा पत्ता लागला नाही. गावातल्या नातेवाईकांकडे जाऊन त्याने विचारणा केली. शिवाय ओळखीतल्या कास्तकारांकडेही तो जाऊन आला. त्यांनीही कमलाबाई आल्याचं सांगितलं नाही. आता मात्र विशाल पार गोंधळून गेला. 'कमलाबाई घर सोडून गेली.'ही बातमी हळूहळू वणव्यासारखी सबंध गावात पसरली.

जो-तो आपापल्या परीने निष्कर्ष काढू लागला. कुणी म्हणे,'ती टेन्शनमुळे घर सोडून निघून गेली असेल'.तर कुणी म्हणे,'चकव्याने तिला नेलं असेल'. काही बहाद्दर तर,'तिला कोणी चेटूक केलं असेल',असेही बरळू लागले.या-ना त्याप्रकारे कमलाबाईच्या नसण्याविषयी चर्चांना उधाण आलं होतं. विशालला मात्र काय करावं, काय नाही,असं झालं होतं.

तसाही तो फार शिकला नव्हता व त्याचाही काही प्रमाणात का असेना,या सार्‍या अंधश्रद्धांवर विश्वास होताच. म्हणून त्याच्या मनाची फार घालमेल होत होती.वडिलांच्या निधनानंतर व दोन्ही बहिनींच्या लग्नानंतर, तो व कमलाबाई हेच एकमेकांच्या सुखदुःखाचे साथीदार होतेे.मोहल्ल्यातल्या एकानेही या मायलेकांना एकमेकांशी भांडताना किंवा वाद घालतांना कधीही बघितलं नव्हतं. कमलाबाई शेतीच्या कामाला जायची तर विशाल घरच्या जुन्या टाटा सुमो, या सवारी गाडीने छोट्या-मोठ्या ट्रीप न्यायचा. कमलाबाईच्या कष्टीकपणामुळे पैशाची तशी फारशी चणचण त्यांना नसायची. एकंदरीत अगदीच सुखी नाही तरी, समाधानकारक असं,आयुष्य कमलाबाई जगत होती.

...कमलाबाईच्या घरामागे पडीक जमीन होती व तिथनं, एक पायवाट 'सनराइज' नावाच्या कंपनीच्या लेआउटकडे  गेली होती. हिवाळ्याची चाहूल लागली असल्याने सगळीकडे हिरवळ होती. शेतात कामाला जाणाऱ्या महिलांनी या हिरवळीतून पायवाट तयार केली होती. कमलाबाई सुद्धा या पायवाटेने बऱ्याचदा मजुरीला जायची. काही वर्षांपूर्वी सनराइज् कंपनीच्या लेआउटच्या जागी एकनाथरावांची शेती होती.कमलाबाईंनी शेतमजूर म्हणून अनेकवेळा या शेतात काम केलं होतं. शेतात मोठी विहीर असल्याने, बारमाही पिकं घेतली जायची.हल्ली लेआऊट बनल्यामुळे, तिकडं कुणी फारसं भटकत नसे.
   ....   कालच्या रात्री विशाल व कमलाबाईंनी सोबत जेवण केलं.जेवताना गप्पाही केल्या.'उद्या  प्रभाकररावांच्या शेतात लवकर कामाला जायचं आहे',असं म्हणून कमलाबाई लवकर झोपायला गेली.तिकडे विशालही जेवणानंतर फेरफटका मारून आला व लगेच झोपी गेला.झोपताना उद्याच्या दिवशी नशिबात काय वाढून ठेवलं आहे, याची कदाचित दोघांनाही कल्पना नव्हती.

...मध्यरात्री दोनच्या सुमारास, अचानक कमलाबाईला जाग आली.सगळीकडे निरव शांतता पसरलेली होती.कमलाबाईने जणू भारावलेल्या अवस्थेत घराचं दार उघडलं. पायात चप्पल घातली. मागे वळून विशालकडे बघितलंही नाही.घरामागच्या पायवाटेला तुडवीत, साप, विंचू,व काट्यांची पर्वा न करता, ती पुढे-पुढे जात होती.तिची दिशा स्पष्ट होती.वाटेत आडवे-उभे रस्ते असणारी सपाट जागा लागली.तिला ती जागा परिचयाची वाटली.कुणीतरी आपल्याला बोलवत आहे,या ओढीने ती पुढे अंधारात जणू गायब झाली...
.... आता मात्र सकाळचे नऊ वाजले होते. काही केल्या कमलाबाईचा पत्ता लागत नव्हता. गावातले तरुणही या शोधमोहिमेत सामील झाले. चारही दिशा, लहान-थोर धुंडाळू लागले. बाहेरगावच्या नातलगांना फोन करून,विचारून झालं.आजूबाजूच्या गावखेड्यातुनही मागोवा घेण्यात आला.आता मात्र कमलाबाईंच्या  घरून जाण्यावर नाही,तर कमलाबाईच्या जिवंत असण्या व नसण्यावर चर्चा होऊ लागली.अवघ्या बावीस-तेवीस वर्षाच्या विशालपुढे,'आईविना पुढचं आयुष्य कसं जगावं'? हा प्रश्न राहून-राहून उभा ठाकू लागला.या घटनेमुळे एरवी शांत असणारं गाव, अचानक खडबडून जागं झालं होतं.
..

..अकरा वाजले, रमेश नावाचा गावातला तरुण मासेमारीसाठी गावच्या बंधाऱ्याच्या दिशेने जायला निघाला. कमलाबाईच्या घटनेबद्दल त्यांने ऐकलं होतं.वाटेत 'सनराइज् लेआउट' लागल्याने व तेथील विहिरीत भरपूर पाणी असल्याने त्याची,पोहायची इच्छा झाली. रमेश तसा पट्टीचा पोहणारा होता. लगेच त्याने पायातली चप्पल काढली व अंगातले कपडे काढले...बघतो तर काय? त्याला विहिरीच्या पायरीवर दोन चपला दिसल्या."अरे वा!पोहायला सोबती आहे वाटतं",असं मनातल्या मनात बोलून, तो आनंदला.विहिरीच्या थडीवर उभं राहून उडी मारणार..तोच त्याला विहिरीत बाईचं प्रेत  तरंगताना दिसलं. प्रेत पाठमोरं  असल्यानं,ते कुणाचं असावं,याचा त्याला अंदाज आला नाही.मात्र गावातल्या चर्चेवरून ते कमलाबाईचं प्रेतअसावं,असं त्याला वाटलं.
  ..... तो तडक गावात आला.लागलीच विशालच्या घरी गेला.गावातली माणसं तिथे होतीच. रमेशच्या सांगण्यावरून संपूर्ण गाव विहिरीच्या दिशेनं निघाला.हौशे-गौशे गोळा झाले. गावातल्या जुन्या- जाणत्या माणसांनी पोलिसांना कळवलं.पोलिसांची गाडी आली.प्रेत विहिरीतून बाहेर काढलं. पोस्टमार्टमला पाठवण्यात आलं. विशाल मात्र धाय मोकलून रडत होता. लगोलग नातेवाईकांना फोन गेले. संपूर्ण गावावर शोककळा पसरली. आता मात्र कमलाबाईच्या जिवंत नसण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.
                      परत गावात चर्चांना उधाण आलं.. .."कमलाबाईला चकव्याने तर विहिरीत ढकललं नसेल.." "तिला भूतानं तर झपाटलं नसेल.".."तिने आत्महत्या तर केली नसेल"..असंख्य तर्क-वितर्कानंतरही, कमलाबाईंच्या मृत्यूचं गूढ आजतागायत कायम आहे...मात्र अजूनही..रात्री अपरात्री.. त्या विहिरीच्या दिशेनं जातांना,कित्येकांना कमलाबाई दिसल्याच्या अफवा वरचेवर गावात पसरत असतात..

Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...