RAM लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
RAM लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

राम

Courtesy:Unsplash
    "राम जन्माला गं सखे,राम जन्मला"ते"राम नाम सत्य है"पर्यंतचा आपला जीवनप्रवास राम नामाच्या साक्षीने होत असतो .एवढेच नाही तर अभिवादन करतांना "रामराम",भीतीने घाबरल्यास "राम-राम-राम-राम",आश्चर्य वाटल्यास"हायराम"यांसारख्या असंख्य भावना आपण राम नामाने अगदी,कळत नकळत व्यक्त करीत असतो.                                     
Courtesy:Unsplash-Olivier Guillard

ग्रामीण भाग असो की शहरी,"राम,श्रीराम, तुकाराम, राजाराम, सखाराम...ई."नावांनी राम आपल्याला पदोपदी भेटत असतो."आयाराम-गयाराम"सारख्या प्रवृत्तीनाही राम नाम लावण्यास आपण कसूर केली नाही,हेही विशेष.सांगायचे तात्पर्य,राम नामाने आपले संपूर्ण भावविश्व व्यापलेले दिसते.                                             
Courtesy:Unsplash-Frank Holleman

हा राम,"राजा की देव","आर्य की अनार्य","भारतीय की विदेशी"असल्या वादात न पडता,सामान्य माणूस त्याला "शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांत,मोलमजुरी करणाऱ्या कष्टकऱ्यांत,दीन-दुबळ्यांत"शोधतो.हा असतो महात्मा गांधींचा राम, जो त्यांनी समाजातल्या शेवटच्या व्यक्तीत पाहिला व रामराज्याचे स्वप्न आजन्म उरी बाळगले तसेच शेवटचा श्वासही "हे राम!!"म्हणत सोडला.           
Courtesy:Unsplash-Aman Upadhyay

सामान्यांनी नेहमीच रामाला आदर्श व मूल्यांचे मूर्तीमंत प्रतीक म्हणून जोपासले आहे.राम म्हणजे,शबरीची उष्टी बोरे खाणारा,पक्षी,वानर,यांच्यात आत्मविश्वास जागवून त्यांच्या साथीने जगज्जेत्या रावणाशी लढणारा नायक,एक आदर्श राजा,पती,भाऊ,मुलगा.. ई.रुपात रामाची प्रतिमा प्रस्थापित झालेली आहे.ही आदर्श व मूल्ये आपण आचरणात आणण्यात कमी पडलो,हे मात्र नक्की.                               
Courtesy:Unsplash-Nandhu Kumar

आज कधी नव्हे एवढा राम नामाचा गजर होत असतांना..सर्व जाती,धर्म,पंथांना स्वीकारणारा "राम"जर आपण स्वीकारला नाही तर येणाऱ्या काळात मात्र आपल्या जगण्यात "राम"राहणार नाही,हेही तितकेच खरे!!! 


Best of glocal marathi

शंभरची नोट

  🍁शंभरची नोट💵 15 ऑगस्ट म्हणजेच,स्वातंत्र्य दिनाचा उत्साह शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ओसंडून वाहत होता.आदल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी शा...