मंगळवार, २८ एप्रिल, २०२६

श्रीमंती

 श्रीमंती




  दि.26 एप्रिल 2026 रविवार रोजी, श्रीमती सुनिता देव मॅडम यांच्या सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन जवाहर नवोदय विद्यालय नागपूर येथे करण्यात आले होते.यासाठी नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी जय्यत तयारी केली होती.वेगवेगळ्या शहरांतून..गावांतून.. ते सर्व आज एकत्र आले होते.येणारा प्रत्येक विद्यार्थी मॅडमच्या चरणांना स्पर्श करीत,त्यांचा आशीर्वाद घेत होता.ढोल-ताशांच्या गजरात..लेझीमच्या तालात.. व रूफ टॉप असणाऱ्या महागड्या गाडीने मॅडमच्या स्वागत समारंभाला सुरुवात झाली.’न भूतो न भविष्यती’असा हा आनंदसोहळा तिथे असणारा प्रत्येक व्यक्ती डोळ्यांत साठवित होता… 

….अशात माझ्या मुलाने मला अचानक एक प्रश्न केला.त्याच्या प्रश्नाने मी क्षणभर विचारात पडलो. 

  तो म्हणाला,”बाबा,तुमच्या मॅडमचे एवढे जंगी स्वागत होत आहे.एवढ्या मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी आले आहेत.त्या खूप श्रीमंत आहेत का?   

यावर मी हसलो व त्याला म्हणालो, “बाळा,आमच्या सुनीता मॅडम,या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत…मात्र त्यांची श्रीमंती पैशांत मोजण्याइतपत स्वस्त नाही….”.

 …माझ्या या उत्तराने त्याचे कितपत समाधान झाले,हे मला आता सांगता येणार नाही.परंतु ही ‘श्रीमंती’ माझ्याप्रमाणे त्याच्याही वाट्याला यावी,असे नकळत वाटून गेले.

Best of glocal marathi

श्रीमंती

  श्रीमंती   दि.26 एप्रिल 2026 रविवार रोजी, श्रीमती सुनिता देव मॅडम यांच्या सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन जवाहर नवोदय विद्यालय नागपूर येथे करण्...